शंकर काळे/ नवी दिल्लीः युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे. जीव मुठीत धरून लोक सैरभर धावत आहेत, भारतीय विद्यार्थीही यात अडकले आहेत, या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ हि मोहीम हाती घेतली आहे. भारत सरकारच्या ऑपरेशन गंगावर अनेकांचा विश्वास आहे म्हणून तर पाकिस्तानी विद्यार्थी आपल्या सुटकेसाठी भारताचा तिरंगा परिधान करीत असल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत.
काय आहे मिशन गंगा ?
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेला भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे. याअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशांच्या मदतीने भारतीय विद्यार्थ्यांना परत बोलावले जात आहे. भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे की, जेव्हाही भारतीय विद्यार्थी बाहेर पडतील तेव्हा त्यांनी तिरंगा परिधान करावा.
तिरंग्याचा अभिमान
भारतीय दूतावासाच्या, भारत सरकारच्या ऑपरेशन गंगावर अनेकांचा विश्वास आहे म्हणून तर पाकिस्तानी विद्यार्थीदेखील आपल्या सुटकेसाठी भारताचा तिरंगा परिधान करत आहेत असे व्हिडिओ आता समोर येत आहेत. ज्यामयुध्ये क्रेनियन आणि रशियन सैनिक तिरंगी वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत.
आजकाल भारतीय असण्याच्या सामर्थ्याची कल्पना करा, युद्धक्षेत्रात तुम्हाला फक्त तुमच्या वाहनावर मोठा भारतीय ध्वज लावायचा आहे, मग कोणीही तुम्हाला हात लावण्याची हिंमत करू शकणार नाही, तिरंग्यामुळे ते सुखरूप परत येऊ शकल्याचेही भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सातासमुद्रपार भारतीय ध्वजाचा मान बघून अनेकांचा ऊर अभिमानाने भरून येत आहे.