दिल्ली- दिल्ली नंतर आता पंजाबवर आम आदमी पार्टीने वर्चस्व गाजवल आहे. पंजाब विधानसभा निवडणूकीत आज आपने सत्ता पालट करत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. याच बरोबर आपच्या या विजयावर देशातून कौतुक होतं आहे. यातच आपचे नेते राघव चढ्ढा यांनी मोठं विधान करत ,देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारं हे विधान आहे.
Arvind Kejriwal is hope of crores of people. If God is willing & people give an opportunity, he will definitely be seen in a bigger role – that of the Prime Minister – soon. AAP will emerge as a major national political force: AAP’s Punjab co-in charge Raghav Chadha on 2024 polls pic.twitter.com/cNWUy0DQl6
— ANI (@ANI) March 9, 2022
राघव चढ्ढा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय शक्ती बनताना मी पाहत आहे. आप काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरची जागा घेणार आहे. ‘आप’साठी पक्ष म्हणून हा एक मोठा दिवस आहे, कारण आज आपण एक राष्ट्रीय पक्ष बनलो आहोत. आता आम्ही प्रादेशिक पक्ष राहिलेलो नाही. देवाच्य आशीर्वादाने एक दिवस अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील आणि देशाचं नेतृत्व करतील, असाही विश्वास चढ्ढा यांनी यावेळी व्यक्त केला.