नवी दिल्ली : देवभूमी अशी ओळख असलेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत एकूण ७० जागांपैकी भाजपाने तब्बल ४२ जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून काँग्रेसला १४ जागांवर आघाडीवर आहे. पंरतू या निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून हरीश रावत यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांनी देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान उत्तराखंडमधून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हरीश रावत यांना उत्तराखंडच्या लालकुआन मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हरीश रावत हे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. हरीश रावत यांचा १३८९३ मतांनी पराभव झाला आहे. तसेच ज्या प्रकारे निकाल समोर येत आहेत, त्यावरून राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून येत आहे.