ईडी कारवाईनंतर सोमय्या आक्रमक; घोटाळेबाजांना सोडणार नाही

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. याची किंमत जवळपास ६ कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित ६कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांचा समावेश आहे. या कारवाईनंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून आक्रमक प्रतिक्रिया दिलीय.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केली असून त्यांची ठाण्यातील मालमत्ताही जप्त करण्यात आलीय. या ट्विटमध्ये त्यांनी घोटाळेबाजांना सोडणार नसल्याचाही इशारा दिलाय.

Share