सिल्वर ओक हल्ला प्रकरण; नागपूर कनेक्शन उघड, संदीप गोडबोले पोलीसांच्या ताब्यात

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर या हल्ल्यामागे नागपूर कनेक्शन असण्याची शक्यता वर्तविली जात होती.  तेच नागपूर कनेक्शन आता अखेर उघड झाले आहे. नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप गोडबोले अस त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो एसटी विभागात यांत्रिक पदावर कार्यरत आहे.

पवारांच्या घरावरील हल्ल्यावेळी गोडबोले सदावर्तेंच्या संपर्कात होते, यामुळे चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्याआधी एक बैठक झाली, नागपुरातूनही एक कॉल आला होता. नागपुरातून कुणाचा फोन आला होता याचा तपास करायचा आहे. फोनसंदर्भात आरोपी कोणतीही माहिती देत नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. यासाठी सरकारी वकीलांनी त्यांची कोठडी मागितली होती. आणि नागपूरवरून कुणाचा कॉल आला होता, याचा तपास करायचा आहे असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात म्हटले होते. यानंतर आता नागपुरातून एका एसटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share