मर्सिडीज,ऑडीसह सर्वच चाकी वाहनांच्या किंमतीत वाढ

एप्रिल महिन्यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी, टोयोटा या कंपन्यांनीही आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीने ही ६ एप्रिलला गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. मारुती सुझुकीने जारी केलेल्या निवेदनानुसार खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी या महिन्यात वाहनांच्या किमती वाढवणार आहे. मॉडेलनुसार वाहनांच्या किमती वाढवल्या जातील. गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या मार्जिनवर परिणाम होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटरने सर्व उत्पादनांच्या किमती ४ % पर्यंत वाढवल्या आहेत. तर टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती २.३% पर्यंत वाढवल्या आहेत. १८ एप्रिलपासून पासूनच कारच्या सगळ्या मॉडेल्सच्या किमती सरासरी १.३ % ने वाढवल्या जात आहेत.

Share