हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडला

गुजरातः गुजरातमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या बराच काळापासून हार्दिक पटेल यांची नाराजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विट केले आहे.

 

पटेल यांनी ट्विट केल की,  “आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.”

गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते आणि सातत्याने प्रदेश नेते आणि हायकमांडला सवाल करत होते. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Share