मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपुर्व जमीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईत सत्र न्यायलयानं हा निकाल दिला आहे. मात्र हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायलयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांना २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावं लागणार आहे तसंच या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आणि १६ तारखेला त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागेल, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.

दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट समाविष्ट आहे. चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत हजेरी लावण्याची अट लागू असण्याची शक्यता आहे. जर या अटीचं उल्लंघन झालं, तर जामीन रद्द करण्यासाठी पोलीस पुन्हा अर्ज करू शकतात, असं देखील प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

Share