UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी ६८५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींनी मारली बाजी आहे. पहिल्या चार स्थानावर मुली आहेत. तर महाराष्ट्रातील ४० हून अधिक उमेदवारांना यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे.UPSC CSE प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती आणि निकाल १७ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती, जी ५ एप्रिल रोजी सुरु झाली आणि २६ मे रोजी संपली होती.
२०२१ च्या यूपीएससी निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं ९७ वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं २०३ वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने २४ा८ वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने ४५१ वा आणि अश्विन गोळपकरने ६२६ वा क्रमांक पटकावला आहे. तर यार्वषी श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे.
युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.