मुंबई : शिवसेनचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. तसेच, उद्या २८ जूनला चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे.यावर आता संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!, असं संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्याबरोबर त्यांनी या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीसांना टॅगही केलेलं आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.