अखिलेश यादव यांचा निवडणूकीच्या निकालावर गौप्यस्फोट

नवी दिल्ली  : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. देशात अनेकांच लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे.तर समाजवादी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्टिट करत पोस्टल बॅलेटचा मुद्दा उपस्थित केला असून सपा-आघाडीला ५१.५ % मते मिळाले असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यानुसार सपा आघाडीला ३०४ जागा मिळाल्याचा दावाही अखिलेश यांनी केला आहे.

अखिलेश यादव यांनी ट्वीट मध्ये म्हटलं की, पोस्टल मतदान करणाऱ्या प्रत्येक सच्चा सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे मतदान केले, असेही ते म्हणाले. यादवांच्या या दाव्यावर भाजपकडून काय उत्तर दिले जाते हे पाहाणे महत्वाचे ठरेलं. तसेच या दाव्यावर निवडणूक आयोग काय प्रतिक्रिया देणार हेही पाहाणे महत्वाचे ठरेल.

कोणाला किती जागा मिळाल्या

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला २७३ जागा, तर समाजवादी पक्षाला १२५ जागा, तर काॅंग्रेस २ आणि बसपला केवळ १ जागा मिळाली आहे.

 

Share