दिल्ली- मागील ५० वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असणाऱ्या अमर जवान ज्योती स्मारकातील ज्वाला राष्ट्रीय युध्द स्मारकामधील ज्वालेत आज विलीन करण्यात येणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २०१९ मध्ये उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन करण्यात येणार आहे. आज विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी या विलीनीकरणानंतर अमर जवान ज्योती विझवली जाणार का? यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.
आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अमर जवान ज्योतीमधील अग्नी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाआधी लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच पंतप्रधान युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करणार आहेत.
आज आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम-
आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत . या कार्यक्रमामध्ये इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योतीमधील आग ही राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवलेल्या स्मारकापर्यंत आणली जाणार आहे. इंडिया गेटजवळ असणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक हे ४० एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे. अमर जवान ज्योती विलीनीकरणानंतर इंडिया गेटवरील ज्वाला विझवण्यात येणार असल्याचा दावा केला जातोय.
The flame of Amar Jawan Jyoti is not being extinguished. It is being merged with flame at National War Memorial. It was an odd thing to see that the flame at Amar Jawan Jyoti payed homage to martyrs of 1971 & other wars but none of their names are present there: GoI Sources
— ANI (@ANI) January 21, 2022
इंडिया गेटवरील ज्योत विझणार का ?
इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती स्मारकावर १९७१ पासून कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या आठवणींमध्ये तेवत ठेवण्यात आलेली ज्योती विझवण्यात येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. अमर जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील ज्योती विलीन केल्या जाणार असून यानंतरही इंडिया गेटवरील ज्योती विझवण्यात येणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.