मुख्यमंत्र्याच्या मेहुण्याची ईडीकडून संपत्ती जप्त

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सदनिकांची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाख रुपये इतके असल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल २१ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय.

Share