Australian Open 2022 : ‘बार्टी’ने इतिहास रचला

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने इतिहास रचला आहे. तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. तिने महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा ६-३, ७-६ असा पराभव केला. हा सामना २७ मिनिटांत संपवला. विशेष म्हणजे बार्टीने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.

ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू बार्टीने २८ वर्षीय कॉलिन्सवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर अमेरिकन खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये थोडी स्पर्धा देण्याचा प्रयत्न केला पण बार्टीने दुसरा सेट ७-६ असा जिंकून आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. बार्टीने यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०२१ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.

४४ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावणारी बार्टी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९७८ मध्ये ख्रिस ओ’नीलने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

Share