सिंधुदुर्ग : भाजप आ. नितेश राणे यांना अखेर जमीन मंजूर झाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी नितेश राणे अटक करण्यात आली होती. न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, नितेश राणे हे आधीपीसूनच या प्रकरणात पोलिसांना तपासात सहकार्य करत आहेत. नितेश राणे यांची पोलीस कोठडीत ४८ तास चौकशी झाली. यावेळी नितेश राणे यांच्या तब्येतीबाबतही वकिलांनी न्यायालयाला माहिती कालच्या सुनावणी दरम्यान दिली होती. यावर न्यायालय आज सुनावणी देणार होतं त्यानूसार नितेश राणेंना आज जामीन मंजूर करण्यात आला.
नेमक प्रकरण काय ?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्यात सापडलेत. त्यांच्यावर या हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे त्यांचाच हात आहे. १८डिसेंबर २०२१रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोघांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.