पिंपरीमध्ये भाजपला धक्का; नगरसेवकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिपंरी चिचवड :  आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे.  भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्ष कविता आल्हाट आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

वसंत बोराटे हे २०१७ साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते.  मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले.

Share