भाजपचे ‘मिशन महानगरपालिका’,नेत्यांना मनपा जबाबदाऱ्यांचे वाटप

मुंबई-  राज्यातील राजकीय वातावरण सध्या अस्थिर असताना महानगरपालिकेच्या निवडणूका येवून ठेपल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारीला लागली आहे. या संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीत येणाऱ्या पालिका निवडणुकासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून मुंबई पालिका निवडणुकीसाठी आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली. या बैठकीत जिल्हानिहाय जबाबदारीचे वाटप भाजप नेत्यांना देण्यात आले.

मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची जबाबादारी आशिष शेलार यांना देण्यात आली आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत भाजपचे ८३ नगरसेवक आहेत.

जिल्हानिहाय जबाबदारी –

ठाणे महानगरपालिका – निरंजन डावखरे

नागपूर महागरपालिका – सुधीर मुंनगंटीवार

उल्हासनगर महापालिका – कुमार ऐलानी

कोल्हापूर महापालिका – धनंजय महाडीक

सोलापूर महापालिका – विजय देशमुख

पुणे महानगरपालिका – राजेश पांडे

चंद्रपूर महापालिका – चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी महानगरपालिका – माधुरी मिसाळ

नाशिक महापालिका – गिरीश महाजन

सहप्रभारी महापालिका – प्रभारी जयकुमार रावल

औरंगाबाद महापालिका – डॉ. भागवत कराड

लातूर महापालिका – संभाजी निलंगेकर

परभणी महापालिका – बबनराव लोणीकर

अकोला महापालिका – रणधीर सावरकर

 

Share