इतकी नौटंकी करून पण तुमचे ‘आदित्यजी’ काय तुम्हाला हात देईना ; मनसेची दीपाली सय्याद यांच्यावर टीका

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसेमध्ये चांगली जुंपली आहे. शिवसेना नेत्या दीपाली सय्याद यांच्याकडून सातत्याने राज ठाकरे यांच्यावर टिका करत आहे. या टिकेला मनसेकडूनही प्रत्युत्तर देत आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी ट्टिट करत दिपाली सय्याद यांच्यावर निशाणा साधल आहे.

पहिले ‘आपचा’हात मग ‘शिवसंग्रामचा’हात आणि आता थेट ‘शिवसेनेचा’हात-पाय पकडून सुद्धा तुमचा राजकीय यशाचा दौरा काय पूर्ण होईना.अहमदनगर झाले मुंब्राकळवा झाले मिळेले फक्त धुतकार म्हणून ही अशी वायफळ बडबडयची पाळी आली. इतकी नौटंकी करून पण तुमचे ‘आदित्यजी’ काय तुम्हाला हात देईना, अशी टिका अखिल चित्रे यांनी केली आहे.

दरम्यान, एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं. तसंच हे एक आंदोलनच असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावर देखील दीपाली सय्यद यांनी टीकास्त्र सोडलं होते. पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार, हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.

Share