ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लिन चीट

मुंबईः आर्यन खानला एनसीबीने  मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात क्लिन चीट दिली आहे. ,या प्रकरणामधील १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

 

एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल,इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयश नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल, भास्कर अरोरा, गोपाल जी आनंद, अचीत कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा या सर्वांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचे एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितले आहे. आर्यन खान, अविन शुक्ला, गोपाल आनंद , समीर साईघन , भास्कर अरोरा, मानव सिंघल या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया क्रूझवर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य २० जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावे लागले होते. हे प्रकरण देशभरात गाजले होते.

Share