मुंबई : महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकराने दिलासा दिला आहे. राज्य सरकारने मुल्यवर्धित करात (Vat) घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात घट झाली आहे. राज्य सरकारने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कपात केली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक २ हजार ५०० कोटींचा भार पडणार आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात ८ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ६ रुपयांनी कपात केली आहे.
केंद्र शासनाने #पेट्रोल आणि #डिझेल चे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (#VAT) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. pic.twitter.com/2BtoUW0Ooi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 22, 2022
केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा मोठा निर्णय काल जाहीर केला. पेट्रोलचा दर ९.५० पैसे आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे.