नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे दसरा ! नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केल्यानंतर या दिवशी देवीला निरोप देण्यात येतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सितामाईची सुटका केली होती. असत्यावर वर सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात. दसऱ्याच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवरून शुभेच्छा देण्यासाठी काही खास दसरा शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी…
“पहाट झाली, दिवस उजाडला
आला आला सण दसऱ्याचा आला
अंगणी रांगोळ्या, दारात तोरण
उत्सव हा प्रेमाचा, सोनं घ्या सोनं
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!”
“झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा”
यशाच्या दारावर
माणुसकीचे तोरण बांधुया
सुखाचं सोनं वाटून
सोन्यासारखी माणूसकी जपूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत. यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभो ही सदिच्छा.
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईटावर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे खास असे
जळोनिया त्या द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे
विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!
आकार,
मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
“विजयादशमी”च्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.
!!!!सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
मराठी अस्मितेची मराठी शान
मराठी परंपरेचा मराठी मान
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल,
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान”
?? शुभ दसरा ??
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….
??????
संस्कृतीचा ठेवूनिया मान
वाटले सोनियाचे पान
स्वीकारताना ठेवा चेहरा हसरा
तुम्हा सर्वांना शुभ दसरा
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा
ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा
सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
रावणाचा वध करुनी राम राज्याने दिला आसरा
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
झेंडूची फुले, आंब्याची पाने घरोघरी तोरणे सजली
रंगबेरंगी रांगोळी सजली
नवरात्रीच्या नऊ दिवसाचा पूर्ण झाला प्रवास
आला दसऱ्याचा दिवस खास
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा