दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार वडिलांच्या संपत्तीवर मुलींंचा हक्क जास्त असल्याच म्हंटल आहे. न्यायालयाने एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्या नंतर त्याचं इच्छापत्र नसेल तर त्याच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुलीचा असेल .तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या भावंडाआधी मुलीचा अधिकार असणार आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल आहे. मृत व्यक्तीच्या पुतण्यांना संपत्ती देण्याऐवजी प्रथम आणि प्राधान्यक्रमाने मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर अधिकार असतो, असं न्यायालयाने म्हटलं आहे. इतकेच नाही तर न्यायालयाने हा नियम हिंदू उत्ताराधिकारी कायदा १९५६ लागू होण्याच्या आधी झालेल्या संपत्ती वाटपालाही नियम लागू होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
Daughter's Right To Inherit Self-Acquired Property Of Father Dying Intestate Recognized Under Customary Hindu Law : Supreme Court https://t.co/V1SGW7QwR1
— Live Law (@LiveLawIndia) January 21, 2022
तामिळनाडूमधील एका प्रकरणामध्ये सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्ण मुरारी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा ५१ पानांचा निकाल दिला आहे. या प्रकरणामध्ये अर्जदार महिलेच्या वडिलांचा मृत्यू १९४९ साली झाल होता. या महिलेनच्या वडिलांनी स्वत:च्या कष्टाने कमवलेली आणि संपत्तीच्या वाटपानुसार मिळालेल्या संपत्ती वाटपासंदर्भात कोणतेही इच्छापत्र मरणापूर्वी तयार केलेले नव्हते . त्यामुळे महिलेने मद्रास कोर्टात याचिका दाखल केली होती.
मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना एकत्र कुटुंब असल्याने संपत्तीवर मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या भावांच्या मुलांचा पहिला अधिकार असल्याचा निकाल दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करत एकुलत्या एक मुलीला वडिलांच्या संपत्तीवरील पहिला अधिकार असतो असं स्पष्ट केलं आहे. हे प्रकरण न्यायालयामध्ये मृत व्यक्तीच्या मुलीचे वारसदार लढत होते.