गोव्यात उत्पल पर्रिकर यांचा पराभव

गोवा : गोव्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पणजी मतदारसंघात  दिवंगत  माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे उमदेवार बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रिकर यांचा पराभव केला. उत्पल पर्रिकर यांचा ७१३ मतांनी पराभव झाला आहे.

भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. पणजीतून उत्पल पर्रिकर यांची आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजप विरुद्ध माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा असा सामना होता. यात कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता होती. मात्र उत्पल पर्रिकर यांचा निसटता पराभव झाला आहे.

गोवा विधानसभेत एकूण ४० जागा आहेत. बहुमतासाठी २२ जागा आवश्यक आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष ११ तर भाजप २० जागांवर आघाडीवर आहे. तर महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ४, आप २ आणि अपक्ष उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत. भाजप पक्ष बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे आता भाजप एकहाती सत्तास्थापन करणार का, हे पाहावे लागेल.
Share