Diwali recipe 2022: वेगवेगळ्या पद्धतीनं करा घरच्या घरी खमंग कुरकुरीत चिवडा

प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली असेलच? बरोबर ना. सगळ्यांच्या घरी गोड पदार्थ बनवण्याची रेलचेल सुरुय. त्यात चिवडा हा अनेकांचा आवडीचा. दिवाळीतील चटकदार आणि ‘करावा तसा आवडणारा’ अशा प्रकारातील हा पदार्थ आहे. चला तर मग त्यातीलच चिवडा रेसिपी जाणून घेऊयात.

तळलेल्या पोह्यांचा चिवडा

साहित्य
एक किलो जाड
एक वाटी खोबऱ्याचे काप
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी काजू बदाम
कढीपत्ता
लाल तिखट
पिठी साखर
हळद
हिंग
मीठ
चिवडा मसाला

कृती
एका कढईत तेल तापवावे आणि मंद गॅसवर खोबरे, शेंगदाणे, काजू, बदाम, कढीपत्ता, पोहे पाठोपाठ तळून घ्यावे.
तेल निथळल्यावर सर्व साहित्य एकत्र करावे.
त्यात हळद, लाल तिखट, चिवडा मसाला, मीठ आणि पिठीसाखर घालावी.
सर्व चिवडा मिसळून एकत्र करावा.
थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा.

Share