‘तळजाईवर कुत्री आनू नका’,पुणेकरांना पवारांचे आव्हन

पुणेः  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवरा यांनी आज सकाळी पुण्यातील तळजाई टेकडीवर होणाऱ्या घाणीवरून भाष्य केले आहे. तळजाई टेकडीवर येताना पाळीव कुत्री घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा. आमच काही म्हणण नाही. पण इथे कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय, असा खोचक टोला अजित पवार यांनी श्वान प्रेमींना लगावला आहे.

अजित पवार म्हणाले की, तळजाई टेकडीवर येताना पाळीव कुत्री घेऊन येऊ नका, कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा. आमचं काही म्हणण नाही. पण इथे कुत्र्यांमुळ प्रश्न निर्माण होतोय. तळजाई परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पूर्वी या परिसरात सश्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र आता ते राहिले नाही. मोरांचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे असत तर २-४ बिबटे आणून सोडले असते. एका रात्रीत कुत्री खलास झाली असती असेही त्यांनी म्हटले आहे. आता इथे आता कुत्री आणायला बंदी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याचवेळी प्राण्यांसाठी अनाथालय सुरु करतोय, त्यासाठी २२ कोटी मंजूर केलेत. असेही त्यांनी सांगितले.

तळजाईच्या टेकडीला कंपाऊंड करावे लागेल. भटकी कुत्री आतमध्ये येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. कारण त्यामुळे टेकडीवरील ससे कमी झालेत, मोराला खातात, पक्षी उडून जातात. काहीजण स्वतःची कुत्री घेऊन येतात. त्यांना कोणी विरोध केला तर ते कोर्टात जातात. पण वनविभागाने नियम केलाय की कोणत्याही प्रकारची कुत्री आणता येणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले की, काही लोक वेडेपणा करतात आणि इथे डुकरं आणून सोडतात. त्यामुळे झाडांवर परिणाम होतो. तळजाईवर देशी पद्धतीची झाडे लावायला हवीत. डस्टबीन आणि पेवरचे रंगही इथल्या वातावरणाला अनुरूप असे हवेत. सिंहगड किल्ल्यावर ई व्हेईकलच्या माध्यमातून लोकांना ये जा करण्याची सोय करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

तळजाईवर प्रतिदिन १  रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. त्याला विरोध झाला. आपण १०० रुपयांचे पेट्रोल घालून इथपर्यंत येतो. पण १ रुपया देणार नाही. पुण्यात लोक खूपच हुशार आहेत लोक लगेच कोर्टात जातात. कुठल्याही गोष्टीला विरोध करण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्याआधी चर्चा करायला हवी. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. मला पिंपरी चिंचवडमध्ये ही अडचण जाणवली नाही. आपण पक्षीय भेद बाजूला ठेवून चर्चा करायला पाहिजे. अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच  मी दर शुक्रवारी-शनिवारी पुण्यात असतो. मी तळजाईला येत जाईन. आपण काही सुर्यमुखी नाही, त्यामुळे लवकर येऊ. आता माझ्यामुळे कलेक्टर आणि सगळ्या अधिकाऱ्यांना लवकर यावे लागते. पण पुणे हवे असेल तर लवकर याव लागत, असे  अजित पवार  म्हणाले.

Share