मुंबईः राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे आज जीएसटी भवनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली यावेळी ते बोलते होते की ,सरकारमध्ये अजिबात मतभेद नाहीत. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे ,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाच राज्य ठरले आहे. ही अभिमानाची बाब आहे. जीएसटी विभाग देशाचा आणि राज्याचा मोठा आधार आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.