मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांच्या भूमिकेबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतेय हे या अपक्ष आमदारांनाही माहीत आहे आणि भाजपलाही माहीत आहे. आमच्या हातात दोन दिवसांसाठी ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस हेदेखील शिवसेनेला मतदान करतील,’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं, अपक्ष आमदारांच्या बाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. आमच्या हातात जर दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील असा हल्लाबोल शिवसेना खा. संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले, आम्हाला सर्वकाही माहिती आहे. विषय संपलेला आहे. एक विजय झाला आणि एक पराजय झाला म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सर्व वाहून गेलं असं होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल लागले आहेत. राज्यस्थानात काँग्रेस जिंकली आहे. हरियाणात रडीचा डाव खेळून निवडणूक आयोग आणि भाजपने अजय माकन यांचा पराभव केला आहे. महाराष्ट्रातही निवडणूक आयोगात हाताशी धरुन रात्रीच्या अंधारात इथले नेते काय करत होते? ही सर्व माहिती आहे आमच्याकडे… गृहखात्याला कसे फोन जात होते, गृहखात्यातून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते. कुणाचं मत बाद करायचं यावर कशी चर्चा होती. यंत्रणा आमच्याकडेही आहे फक्त ईडी नाहीये. जर ईडी आमच्याकडे ४८ दिली तर भाजप सुद्धा आम्हाला मतदान करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.