फीफा वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. 2022 वर्ल्डकप स्पर्धेची सांगता 18 डिसेंबर 2022 रोजी अंतिम सामना झाल्यानंतर होणार आहे. अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स या संघात होणार आहे. या स्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वीच 2026 या विश्वचषकाची तयारी सुरु झाली आहे. ही फुटबॉल स्पर्धा उत्तर अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धचं यजमानपद कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका संयुक्तपणे बजावणार आहे. या स्पर्धेत 32 ऐवजी 48 सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर फुटबॉल वर्ल्डकप समिती मंथन करत आहे. ग्रुप स्टेजमध्ये तीन तीन संघाचे 16 ग्रुप तयार केले जातील. त्यापैकी दोन संघ पुढच्या फेरीत पात्र ठरतील. त्यामुळे भारताला या स्पर्धेत स्थान मिळवण्याची नामी संधी आहे. भारताला 48 संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आतापासूनच विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. सध्याच्या फीफा क्रमवारीत भारताचं 106 वं स्थान आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड: कधी आणि कुठे होणार लढती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक:
अमेरिकेत कुठे होणार सामने- अँटलांटा, बोस्टन, डलास, ह्यूस्टन, कॅन्सास, लॉस एजिल्स, मियामी, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, सॅन फ्रासिस्को, सिएटल.
मॅक्सिको- गौडालाजारा, मॅक्सिको सिटी, मॉन्टेरी
कॅनडा- टोरंटो, वॅकूवर
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी असा आहे भारतीय फुटबॉल संघ –
- गोलकिपर – गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, विशाल कैथ
- डिफेंडर्स – आकाश मिश्रा, मेहताब सिंग, राहुल भेके, निखिल पुजारी,सुभाशिष बोस, अन्वर अली, अमेय रनावडे, जय गुप्ता.
- मिडफिल्डर – अनिरुद्ध थापा, ब्रेंडन फर्नांडिस, लिस्टन कोलास, महेश सिंग नाओरेम, सहल अब्दुल सामद, सुरेश सिंग वँगजम, जिक्सन सिंग थौनौजाम, दीपक तंग्री, लालेंगमाविया राल्टे, इम्रान खान
- फॉरवर्ड्स – सुनील छेत्री, लल्लियांझुआला छांगटे, मनवीर सिंग, विक्रम प्रताप सिंग.