नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ कायम आहे. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ८३पैशांनी वाढले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये इंधन प्रति लिटर मागे तब्बल ३.२० रुपयांनी महाग झाले आहे. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन नुसार आज आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर ९८.६१ तर डिझेल ८९.८७ रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर ११३.३५तर डिझेलचा दर ९६.७० रुपये इतका आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 98.61 per litre & Rs 89.87 per litre respectively today (increased by 80 paise)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 113.35 & Rs 97.55 (increased by 84 paise & 85 paise respectively)
(File pic) pic.twitter.com/9r1RQSvTH8
— ANI (@ANI) March 26, 2022
जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ चालूच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. २२ आणि २३ मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत ८०-८० पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर २०२१ पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.