मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.
मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समूह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा बुस्टर डोस घेतला.
आज मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात राज्याचे आरोग्यमंत्री मा. @rajeshtope11 यांच्यासह कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेनं कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचं आवाहन यानिमित्तानं करतो. pic.twitter.com/UYurp02kVC
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 2, 2022
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा. तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर
सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर गेला होता त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते त्यांनी सांगितले की रुग्ण संख्या वाढत असली तरी आपल्याकडे रुग्णांवर केली जाणारी उपचार पद्धतीमुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले होते.