कर्नाटकातील महाविद्यालयात मुस्लीम मुलींना हिजाबसाठी मनाई

कर्नाटक- कर्नाटकातील कुंडापूर येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात मुस्लीम मुलींना हिजाब घालून येण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधीही येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. याचे तीव्र पडसाद उमटतांना दिसत आहेत. हा एकंदर प्रकार म्हणजे  या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. अशी टिका सर्वत्र केली जात आहे. यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

हे  महाविद्यालय उडूपी जिल्ह्यात आहे. तेथे विद्यार्थ्यांना  गणवेश ठरवून देण्यात आलेला नाही. मात्र काही हिंदू संघटनांनी तेथे भगव्या शाली पांघरून येण्याचा इशारा दिल्यानंतर  मुख्याध्यापकांनी महाविद्यालयाची प्रवेशद्वारे टाळेबंद केली. त्यांनी हिजाब घातलेल्या मुलींना प्रवेशास मनाई केली. मात्र प्रशासनाने मुलींना पुर्व सुचना दिल्याचे म्हंटले आहे.

यावर कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी स्पष्टीकरण देत म्हंटल आहे की, या विद्यार्थीनी याआधी हिजाब घालून महाविद्यालयात येत नव्हत्या, हा प्रकार २० दिवसांपासून सुरु झाल्याने हि समस्या निर्माण झाली आहे.

 

Share