मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे आज कच्च्या तेलाची किंमत वाढली असून कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. मात्र तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २१ मे रोजी केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २२ मे ला पेट्रोलचे दर ९.५० रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ६ रुपयांनी स्वस्त झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज मुंबईत पेट्रोलचा दर १०६.२५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.७४ रुपये तर डिझेलचा दर ९३.२३ रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.२३ रुपये तर डिझेलचा दर ९२.५८ रुपये प्रति लिटर आहे.
कच्च्या तेलाच्या किमती काय?
गेल्या काही दिवसांत प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा घसरत आहेत. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल ९४.०२ डॉलरपर्यंत घसरली. तर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ९९.३४ डॉलरवर घसरल्याचं दिसून आलं. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारनं पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपयांची कपात करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.