भविष्यात आप काँग्रेसची जागा घेणार, आपच्या नेत्याचे विधान

दिल्ली- दिल्ली नंतर आता पंजाबवर आम आदमी पार्टीने वर्चस्व गाजवल आहे. पंजाब विधानसभा निवडणूकीत आज आपने सत्ता पालट करत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. याच बरोबर आपच्या या विजयावर देशातून कौतुक होतं आहे. यातच आपचे नेते राघव चढ्ढा यांनी मोठं विधान करत ,देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारं हे विधान आहे.

राघव चढ्ढा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय शक्ती बनताना मी पाहत आहे. आप काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरची जागा घेणार आहे. ‘आप’साठी पक्ष म्हणून हा एक मोठा दिवस आहे, कारण आज आपण एक राष्ट्रीय पक्ष बनलो आहोत. आता आम्ही प्रादेशिक पक्ष राहिलेलो नाही. देवाच्य आशीर्वादाने एक दिवस अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील आणि देशाचं नेतृत्व करतील, असाही विश्वास चढ्ढा यांनी यावेळी व्यक्त केला.

पंजाबच्या जनतेने केजरीवालांच्या कारभाराचे मॉडेल पाहिले आहे आणि त्यांना ते आजमावून पहायचे आहे. ज्यांनी पाच दशकांपासून पंजाबच्या लोकांना त्यांच्या हक्काच्या सोयीसुविधांशिवाय ठेवले होते आणि ज्यांना आपण कायमचे राज्य करू असे वाटले होते ते आता बाहेर फेकले गेले आहेत.  लोकांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, असंही चढ्ढा  म्हणाले.

 

 

Share