IND vs PAK Asia Cup: आशिया चषक टी-20 स्पर्धेत आज पुन्हा एकदा सायं. ७.३० वा. भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे. सलग दुसऱ्या रविवारी पुन्हा क्रिकेटरसिकांना भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील द्वंद्वाची अनुभूती घेता येणार आहे. ‘अव्वल चार’ फेरीमधील पहिल्या लढतीत भारतीय संघाला तारांकित आघाडीच्या फलंदाजीच्या फळीत सुधारणा आणि गोलंदाजीच्या माऱ्याची पुनर्रचना करावी लागणार आहे.
भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. आता आशिया चषक टी-20 स्पर्धेत अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला आजची कठीण परीक्षाही पास करावी लागणार आहे. साखळी सामन्यातील विजयात मोलाची कामगिरी बजावणार रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी द्यायची की रिषभ पंतच्या रुपाने अतिरिक्त फलंदाज खेळवायचा याचा फैसला संघ व्यवस्थापनाला करायचा आहे. शिवाय रोहित, राहुल यांनाही कामगिरीत सुधारणा करावी लागेल. दुसरीकडे हाँगकाँगचा 38 धावात खुर्दा पाडणाऱ्या पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे आज होणार सामना नेहमीप्रमाणे काँटे की टक्कर ठरणार यांत शंका नाही.
अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आर अश्विन.
पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रउफ, हसन अली.
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (एचडी वाहिन्यांसह)