भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा केला पराभव.

रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. शनिवारी भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली.

धरमशाला कसोटी सामन्यात इंग्रजाचा तीन दिवसात खेळ खल्लास झाला. तत्पूर्वी, चारही सामने चौथ्या दिवसापर्यंत गेले होते. टीम इंडियाचा हा विजय खूप ऐतिहासिक आहे कारण कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षांनंतर, पहिल्या कसोटी सामन्यात पराभवानंतर संघाने 4-1 पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे.

म इंडियाच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार शतके करत केलेली 171 धावांची भागीदारी त्यानंतर सर्फराझ खान व देवदत्त पडिक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 477 धावापर्यंत मजल मागली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने आठ विकेट्सवर 473 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली, पण अवघ्या चार धावा करत उर्वरित दोन विकेट गमावल्या. कुलदीप यादव (30) बुमराह (20) आऊट झाले आणि टीम इंडियाने 259 धावांची मोठी आघाडी घेतली.

भारतात आघाडीचे फलंदाज नसताना टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे दिग्गज खेळाडूंची उणीव कुठेच भासली नाही. उलट नवोदित खेळाडूंना संधी मिळाल्याने त्यांना आपली चमकदार कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली. बऱ्याचदा नवोदित खेळाडूंना विदेशी धरतीवर संधी मिळते. अशावेळी स्वत:ला सिद्ध करणं कठीण होतं. पण दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे ही संधी आपसूकच नवोदित खेळाडूंकडे चालत आली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं.

Share