मुंबई : अखेर ३८ दिवसानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. आज सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी आमदारांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही, यावरुन आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने ट्विट शेअर करत टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट मध्ये म्हटले की, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उघडपणे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये एकही महिला मंत्री नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात.
— Supriya Sule (@supriya_sule) August 9, 2022
मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
भाजपतील मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील
सुधीर मुनगंटीवार
चंद्रकांत पाटील
विजयकुमार गावित
गिरीश महाजन
सुरेश खाडे
रवींद्र चव्हाण
अतुल सावे
मंगलप्रभात लोढा
शिंदे गटातील मंत्री
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
संदीपान भुमरे
उदय सामंत
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
दीपक केसरकर
शंभूराज देसाई