मुंबई- मध्य रेल्वेने मुंब्रा, कल्याण, डोंबिवलीसह रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेरुळाशेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस देत सात दिवसांच्या आत घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. यावर स्थानिकांसह खासदार आणि आमदारही आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही इशारा दिला आहे . जितेंद्र आव्हाड यांनी आधीही निवारा हा त्यांचा हक्क असून कोणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहीन असं म्हटलं होतं.
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर 10 झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो. तर लढाऊ असतो.
क्या गरिबोकि जान, जान नहीं होती सेठ. pic.twitter.com/5fsjkWiLat
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 22, 2022
रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या लाखो गरिबांना घरे खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत. केंद्र सरकारने वेळीच निर्णय घ्यावा. नाहीतर १० झोपडपट्टी वासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होऊन जाईल. गरीब लाचार नसतो तर लढाऊ असतो. क्या गरिबोकि जान, जान नहीं होती सेठ,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.