करुणा-धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी येणार- करुणा शर्मा

कोल्हापुर : करुणा शर्मा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करुणा मुंडे केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करुना शर्मा म्हणाले की, जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे. आपण महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहोत. कोल्हापुरातील घराणेशाहीच्या राजकारणामुळे इथला विकास थांबला आहे. त्यामुळे इथली घराणेशाही आपण संपवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या या आरोपाला धनंजय मुंडे काय उत्तर देणार याची उत्सुकता साऱ्यांनाचा आहे.

करुणा मुंडे यांनी यावेळी म्हटलं की, जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की,  करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे त्यांना आत र्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. कारण माझ्याकडे सारे कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे मला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

Share