दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात ईडीच्या कोठडीत आहेत. तुरुंगातून त्यांनी जनतेसाठी संदेश पाठवला आहे. आज त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सर्वांना या संदेशाविषयी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने तीन मिनिटे 16 सेकंदाचा व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. यात दिल्लीकरांचा मुलगा आणि भाऊ अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून तुमच्यासाठी संदेश पाठवलाय. तुरुंगात असो वा बाहेर, त्यांना देशाची सेवा करायचीय आणि त्यांना भारताला पुढे न्यायचे आहे, असे त्यांनी म्हटलंय. अरविंद केजरीवालांचा संदेश असा की, “माझ्या प्रिय देशवासियांनो मला काल अटक करण्यात आली. मी तुरुंगात असेन किंवा बाहेर, प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहिल. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे. माझं जीवन हे कायमचं संघर्षमय राहिलं आहे, त्यामुळं मला ही अटक मला विशेष वाटत नाही.
आपल्याला भारताला देशातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र बनवायचं आहे. भारतात आणि भारताबाहेर अनेक शक्ती आहेत ज्या देशाला कमजोर करत आहेत. आपल्याला या शक्तींना हारवायचं आहे. मी लवकच बाहेर येईल आणि आपला वायदा पूर्ण करेन. मी जरी तुरुंगात गेलेलो असलो तरी माझी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपलं समाज कल्याणाचं काम थांबता कामा नये. त्यासाठी भाजपच्या लोकांचा द्वेष करु नका, ते आपले भाऊ-बहिण आहेत. मी लवकरच परत येईन”