किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन ; उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांना मोठा दिलासा दिला असून, आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी  त्यांना अटकेपासून संरक्षण मिळाल आहे . तसेच अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र  उच्च न्यायालयाने सोमवारपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचा आदेश ही दिला आहे

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता, याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्धनौका जतन करण्यासाठी २०१३ मध्ये नागरिकांकडून निधी गोळा केला होता. त्याची सुमारे ५७ कोटी रुपयांची रक्कम अद्याप सरकारकडे जमा झालेली नाही. त्याबाबत माजी लष्करी जवानाने फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स बजावले होते. मात्र सोमय्या चौकशीला गैरहजर राहिले. दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या रककमेबाबत समाधानकारक माहिती सोमय्या यांनी दिली नाही त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जमीन नामंजूर केला होता. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी आता उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

Share