अश्लील व्हिडिओ प्रकरणात किर्तनकार बाबाला अटक आणि सुटका

औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तनकार बाबाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किर्तनकार बाबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वारकरी सांप्रदायातून होत होती. बाबासोबत व्हिडीओतील महिलाही किर्तनकार होती. त्यामुळे वारकरी सांप्रदाय संगटनांकडून या घटनेचा तीव्र विरोध होत होता. अखेर मंगळवारी रात्री या रंगेल महाराजाला शिल्लेगाव (ता.गंगापूर) पोलिसांनी अटक केली. गंगापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महाराजास जामीन मंजूर केला आहे.

गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून किर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली. या किर्तनकार महाराजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Share