लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १३ जुलैला आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी जिल्ह्यातील तालुकानिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आरक्षण सोडत डी.पी.डी.सी. हाॅल, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १३ जूलै रोजी दुपारी १२ वा. काढण्यात येणार आहे.
पंचायत समिती आरक्षणासाठी तालुकानिहाय ठिकाणे रेणापूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, शिरुरअनंतपाळ, जळकोट व देवणी करीता आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयामध्ये दिनांक १३ जूलै २०२२ रोजी दुपारी १२ (निलंगा साठी दुपारी ३ वा. व देवणीसाठी सकाळी ११ वा) काढण्यांत येणार आहे.
त्याचप्रमाणे पंचायत समिती लातूर करीता जुने डी.पी.डी.सी.सभागृह, प्रशासकीय इमारत, शिवाजी चौकाजवळ, लातूर येथे, पंचायत समिती औसा करीता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मिटींग हॉल, औसा येथे, पंचायत समिती चाकूर करीता पंचायत समिती सभागृह, चाकूर येथे दि. १३ जूलै २०२२ रोजी दुपारी १२ वा.आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करावयाचा दि १५ जूलै २०२२ असा असून त्यावर हरकती व सुचना जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे दि. १५ जूलै २०२२ ते २१ जूलै २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची आरक्षण सोडतीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.