मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत बंडखोर आमदारांना पाठवलेली अविश्वासाची नोटीस अवैध होती. ही नोटीस कोणत्याही अधिकृत ई-मेल वरून पाठवली नव्हती. एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने ही नोटीस आली होती. त्यामुळे ही ग्राह्य धरण्यात आली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव ११ जुलैपर्यंत फेटाळण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणाले कि, अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ मविआ चे मुख्यमंत्री महापुजा करतील तोवर बंडखोरांनी गुवाहाटी थांबण्यास हरकत नाही. “एकादशी” तिकडे आणि द्वादशी हिकडे असे ते ट्विटमध्ये म्हणाले.
अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ मविआ चे मुख्यमंत्री महापुजा करतील तोवर बंडखोरांनी गुवाहाटी थांबण्यास हरकत नाही. "एकादशी" तिकडे आणि द्वादशी हिकडे #कायतेहाटीलकायतेजंगलकायतोडोंगर
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 27, 2022
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील ५ मोठे मुददे पुढील प्रमाणे आहेत. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली. उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना १२ जुलै सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि अजय चौधरी, तसंच केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस, म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षणं करावे. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. तसेच ११ जुलैपर्यंत बहुमत चाचणी घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी.