उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवानं या हल्ल्यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. याप्रकरणी हापूर पोलिस अधिक तपास करत आहेत
ओवेसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचार कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेने जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. तसेच देशातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत.
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
छिजारसी टोल नाक्यावर आपल्या ताफ्यावर गोळीबार झाला, ४ राऊंड फायर झाले, ३ ते ४ लोक होते, हल्ला केल्यानंतर त्यांनी शस्त्र तिथेच टाकत पळ काढला. माझी गाडी पंक्चर झाली म्हणून, मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो, मी सुरक्षित आहे, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार या दोघांचीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी आहे. एका खासदारावर गोळीबार कसा होऊ शकतो, असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.