हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे निवडणूक लढवणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे, ती चर्चेत आली आहे.
प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी मकरंद अनासपूरे यांनी म्हटले आहे की, निसर्गाचे भाकीत आपण करु शकत नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न होत आहेत. मात्र एक एनजीओ म्हणून आपली एक वेगळ्या प्रकारची भूमिका असते. हेही लक्षात घ्यायला हवे. असे अनासपूरे यांनी म्हटले आहे.
यानंतर नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही अमोल कोल्हेंच्या जागी तुम्ही निवडणूक लढवणार का? यावर नाना पाटेकर म्हणाले, “राजकारण हा माझा प्रांत नाही. कारण तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही. मनात आलेलं सगळं आपण बोलू देतील माहीत नाही. तसंच किती राहू देतील ते पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही नामच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत. गुवाहाटी, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही आम्ही ही मोहीम घेऊन जात आहोत” असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.