मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करत असल्याची घोषणा केली. तसंच दौरा रद्द करण्यामागील कारणांवर राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत भाष्य केलं. माझा अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोपह केला. परंतू राज ठाकरेंनी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेणं टाळलं होतं. मात्र आता हळूहळू रसद पुरविणांऱ्याचे नाव समोर येऊ लागले आहे. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी एक फोटो ट्वीट केला असून या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्य दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. जोपर्यंत उत्तरभारतीयांची राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होते. याच बृजभूषण सिंह यांचे जुने फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोजमध्ये बृजभूषण सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत स्टेजवर एका कार्यक्रमात आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळे सुद्धा फोटोमध्ये दिसत आहेत.
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
मनसेकडून शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमुळे आता विविध चर्चा रंगत आहेत. ‘कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है’ असं कॅप्शन लिहून हे फोटो मनसेकडून शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी शरद पवारांनी रसद पुरवली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.