मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर येऊ लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट मध्ये म्हटलं की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, तसेच माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.
I have tested #COVID19 positive and in home isolation.
Taking medication & treatment as per the doctor’s advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022
दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.