Patra Chawl Case; स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदवलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाटकर यांनी ईडीला ही माहिती दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील साक्ष मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.

मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास  प्रकल्पात झालेल्या घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. ईडीने स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची चौकशी देखील झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतले असल्याचे सांगण्यात यावे. ही धमकी ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने असावेत असे पाटकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा 1,034 कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share