पंतप्रधान मोदींकडून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन म्हणाले…

नवी दिल्ली : शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवन येथे पार पडला. राजभवनच्या दरभार हाॅलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपय दिली. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवनिर्वाचीत मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून आज ज्यांनी शपथ घेतली, त्या सर्वांचे अभिनंदन. प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाने कारभार करण्याचा ध्यास असलेल्या व्यक्ती यांचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम आहे. राज्याच्या जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा”, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

दरम्यान, महत्वाचं म्हणजे मोदींनी हे ट्विट मराठीत केलं आहे. राज्यातील शिंदे सरकार सत्तेवर येण्यामागे भाजपचा मोठा सहभाग आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनी देखील ते गुहावाटीमध्ये असताना आपल्या पाठीमागे एका महासत्तेचा हात असल्याचं म्हटलं होतं.

मंत्रिमंडळात कोणाला स्थान?

भाजपकडून मंत्री
१. राधाकृष्ण विखे पाटील
२. सुधीर मुनगंटीवार
३. चंद्रकांत पाटील
४. गिरीश महाजन
५. विजयकुमार गावित
६. रविंद्र चव्हाण
७. मंगलप्रभात लोढ
८. सुरेश खाडे
९. अतुल सावे

शिंदे गटातील मंत्री 

१. दादा भुसे
२. संदीपान भुमरे
३. उदय सामंत
४. तानाजी सावंत
५. दीपक केसरकर
६. शंभुराजे देसाई
७. अब्दुल सत्तार
८. गुलाबराव पाटील
९. संजय राठोड

Share