नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरला जपानला भेट देणार असून, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होणार आहेत, ज्यांना जुलैमध्ये गोळी मारण्यात आले होते. १० जुलै रोजी हाऊस ऑफ कौन्सिलर्सच्या निवडणुकीपूर्वी पश्चिम जपानमध्ये प्रचाराचे भाषण देत असताना जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले अबे यांची ८ जुलै रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोदी २७ सप्टेंबर रोजी राजकीय अंत्यसंस्कारासाठी जपानला भेट देतील,अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
जपानच्या नारा शहरात त्यांना एका व्यक्तीने मागून गोळी घातली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. शिंजो आबे यांच्यावर हा हल्ला झाला, तेव्हा ते एका छोट्या जाहीर सभेला संबोधित करत होते. गोळी लागल्याने त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी त्यांच्या या दौऱ्यात पंतप्रधान फुमियो किशिदा, शिंजो आबे यांचे जवळचे सहकारी यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात आबे यांच्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि म्हणाले की, आबे यांनी आपले संपूर्ण आयुष्य जपान आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी समर्पित केले होते.
पीएम मोदी आणि शिंजो आबे यांची मैत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत होती. शिंजो आबे यांच्या निधनाने पंतप्रधान मोदींना खूप दुःख झाले. याचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये केला आहे. पंतप्रधानांनी लिहिले की, मला आज त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो. क्योटो येथील ‘तोजी मंदिरा’ला भेट असो, शिंकासेनमध्ये एकत्र प्रवास करण्याचा आनंद असो, अहमदाबादमधील साबरमती आश्रम, काशीमधील गंगा असो. आरतीचा आध्यात्मिक प्रसंग असो किंवा टोकियोचा ‘चहा समारंभ’, ही संस्मरणीय क्षणांची यादी खूप मोठी आहे. पीएम मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, माउंट फुजीच्या पायथ्याशी वसलेल्या अतिशय सुंदर यमनाशी प्रांतातील त्यांच्या घरी भेट देण्याची संधी मला मिळाली, तो क्षण मी कधीही विसरणार नाही. हा सन्मान मी नेहमी माझ्या हृदयात जपत राहीन.
I am shocked and saddened beyond words at the tragic demise of one of my dearest friends, Shinzo Abe. He was a towering global statesman, an outstanding leader, and a remarkable administrator. He dedicated his life to make Japan and the world a better place.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
पीएम मोदींनी केले होते ट्विट
पीएम मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते की, माझ्या एका प्रिय मित्र शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ते जागतिक पातळीवरील एक उत्कृष्ट राजकारणी, एक उत्कृष्ट नेता आणि आश्चर्यकारक प्रशासक होते.